डोळा Eye


 

मानवी डोळ्यावर अत्यंत  पातळ पारदर्शक पटल असते. त्याला पारपटल म्हणतात. 

 

या पटलातूनच प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटला द्वारे होते.

 

या पटलाच्‍या मागे गडद मांसल पडदा असतो. त्‍यालाच बुबुळ म्‍हणतात. वेगवेगळ्या लोकांच्‍या बुबुळाचे रंग वेगवेगळे असतात.

बुबुळाच्‍या मध्‍यभागी बदलत्‍या व्‍यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्‍यालाच डोळ्याची बाहुली म्‍हणतात.

 

डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ‘डोळ्याची बाहुली’ उपयुक्‍त असते.

 

जर प्रकाश जास्‍त असेल तर बाहुलीचे आकुंचन होते तसेच कमी प्रकाशात बाहुली रूंदावते.बुबुळाच्‍या पृष्‍ठभागावर पारदर्शक पटलांचा फुगवटा असतो.

 

डोळ्याच्‍या बाहुलीच्‍या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्‍फटिकमय भाग असतो. ते भिंग होय.

 

स्‍फटिकमय भिंग त्याच्या नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करते. या भिंगामुळे डोळ्याच्‍या आतील पडदयावर वास्‍तव आणि उलट प्रतिमा तयार होते.

 

डोळ्याचा पडदा (दृष्‍टिपटल) हे एक संवेदनशील पटल असते.

या मध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात

 

या पेशी प्रकाशित झाल्या वर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात. हे विद्युत संकेत डोळ्या संबंधीच्या मज्जा तंतू द्वारे मेंदूकडे पाठविले जातात.


Comments

Popular posts from this blog

स्वधा स्तोत्र (Swadha Stotra)

MSCI 37 Key ESG Indicators

ESG Implementation Timeline