यकृत Liver


 


शरीरातील सुमारे 7% लोह यकृतात साठवलेले असते.

 

यकृता मध्ये सहा महिने पुरेल एवढा 'जीवनसत्त्वचा साठा असतो

 

आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे.

 

निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासुन बिलिरुबिनची निर्मीती करणे.

 

तसेच पित्त रस तयार करून त्या द्वारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे.

मानवाचे यकृत हे १.३ ते ३.० कि.ग्रॅ. इतक्या वजनाचे असते. हे नरम व गुलाबी करडया रंगाचे असते. 

 

हे मानवाच्या शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचे अवयव व सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे अवयव उदराच्या वरच्या बाजुस बरगड्यांच्या खाली स्थित असते.

 

शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते.

 

आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं.

 

शरीरातील अनावश्‍यक गोष्टींचा, विषद्रव्यांचा निचरा करण्याची जबाबदारीही यकृतावर असते. विषद्रव्ये, रासायनिक द्रव्ये, अनैसर्गिक पदार्थांचा यकृतावर ताण येऊ शकतो, ज्याचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो.


Comments

Popular posts from this blog

स्वधा स्तोत्र (Swadha Stotra)

ESG Implementation Timeline

MSCI 37 Key ESG Indicators