न्यूटनचे गतीचे नियम  Newtons Laws of Motion


 


भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे तीन नियम हे अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात. हे नियम खालीलप्रमाणे आहेत.

 

पहिला नियम: जडत्वीय संदर्भ चौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहाते.

 

न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम : संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.’

 

न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम : प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात.


Comments

Popular posts from this blog

स्वधा स्तोत्र (Swadha Stotra)

ESG Implementation Timeline

MSCI 37 Key ESG Indicators