प्राणी पेशी Plant Cell


 


पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे . पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे.

सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच पेशीअंगके म्हणतात.

या पेशी पटलांच्या साहाय्याने बनलेल्या विविध अंगकांच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात.

प्राणी पेशीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामध्ये पेशीभित्तिके  ऐवजी पेशीपटल असते व हे  प्राणी पेशीचे सर्वांत बाहेरचे आवरण असते.

पेशीपटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक, लवचीक असते

तिचा आकार गोलाकार किंवा अनियमित असून लांबी १०—३० मायक्रोमीटर असते. 

प्राणी पेशीत मुख्यत: पेशी पटल (पेशीद्रव्य पटल), पेशीद्रव्य, केंद्रक, आंतर्द्रव्यजालिका, गॉल्जी  पिंड, लयकारिका, तंतुकणिका, रिक्तिका इत्यादी अंगकांचा समावेश होतो. 

प्राणी पेशीत हरितलवके नसतात.

प्राणीपेशींमध्ये  रिक्तिका आकाराने छोट्या असतात.


Comments

Popular posts from this blog

MSCI 37 Key ESG Indicators

Government Launches Twin Initiatives: DDKY & National Mission on Natural Farming

Indore Municipal Corporation's Green Bond: A Milestone in Urban Sustainability