वनस्पती पेशी Plant Cell


 



पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे . पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे.

सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच पेशीअंगके म्हणतात.

या पेशी पटलांच्या साहाय्याने बनलेल्या विविध अंगकांच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात.

वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका असते त्या मुळे त्यांना  विशिष्ट आकार प्राप्त होतो.

पेशीमध्ये पेशीकेंद्रकाव्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो त्याला पेशीद्रव म्हणतात. पेशीद्रव हे पेशीपटल आणि केंद्रक यांदरम्यान असते. पेशींची विविध अंगके यामध्ये विखुरलेली असतात.

वनस्पती पेशीमधील वेगवेगळे घटक आहेत . या मध्ये प्रामुख्यान केंद्रक, आंतरर्द्रव्यजालिका, गॉल्जीपिड, लयकारिका, रिक्तिका,तंतुकणिका, लवके यांचा समावेश होतो.

वनस्पतीं पेशींमध्ये हरितलवक असते.

वनस्पतीपेशीं मध्ये एकच मोठी रिक्तिका असते.



Comments

Popular posts from this blog

स्वधा स्तोत्र (Swadha Stotra)

MSCI 37 Key ESG Indicators

ESG Implementation Timeline