खडक आणि खनिजे Rocks And Minerals


 


भूकवचातील साधन संपत्ती मध्ये खनिजे, धातुके, खनिज तेल व इतर इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये इत्यादींचा समावेश होतो.

 

खनिजे आणि धातुके (Minerals and Ores)


नैसर्गिक साधन संपदेत खनिज संपदेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही खनिजे तयार झालेली असतात.

पृथ्वी वरील खडक मुख्यत्वे खनिजांचे बनलेले असतात.

खाण कामा द्वारे ही खनिजे मानवास उपलब्ध होतात.

निसर्गात थोडेच धातू मुक्त स्थितीत आढळतात. उदा., सोने,चांदी, तांबे, प्लॅटिनम आणि बिस्मथ. बहुतेक सर्व धातू संयुगांच्या स्वरूपात आढळतात. ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्याला धातुक म्हणतात.

भूकवचातील मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हारस थंड झाल्याने त्याचे स्फटिकांत रूपांतर होऊन खनिजनिर्मिती हाेते.

बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायुरूप स्फटिक शिल्लक राहिल्याने खनिजनिर्मिती होते.



Comments

Popular posts from this blog

Registration Process on National Innovation Foundation (NIF) Portal राष्ट्रीय नवाचार प्रतिष्ठान (NIF) पोर्टल पर विद्यालयों का पंजीकरण प्रक्रिया

Rare Earths Elements (REE) and Responsible Mining: An ESG Roadmap for India

तरंगणारी  पेन्सिल FLOATING PENCIL