पवनचक्की  Wind Energy


 

पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे.

पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता ऊर्जा मिळवता येते.

महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की ही पुण्याच्या वेधशाळेत होती.

आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा शहराजवळील चाळकेवाडी येथे आहे.

सातारा परिसरातही कोरेगाव, खटाव व माण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारल्या आहेत.

वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की (Wind Turbine) म्हणतात

यामध्ये असलेल्या टर्बाइनच्या पात्यांवर वाहती हवा आदळल्यावर ती पाती फिरतात.

टर्बाइनचा अक्ष, गती वाढविणाऱ्या गिअर बॉक्स (Gear box) मार्फत जनित्राला जोडलेला असतो.

फिरणाऱ्या पात्यांमुळे जनित्र फिरते व विद्युत ऊर्जा निर्माण होते.

अगदी 1 kW पेक्षा कमी क्षमतेपासून तर 7 MW (7000 kW) एवढ्या क्षमते  चेपवन-निर्मिती यंत्र उपलब्ध आहेत.

ज्या ठिकाणी पवन-ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे, तिथे उपलब्ध असलेल्या हवेच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसविण्यात येतात.


Comments

Popular posts from this blog

MSCI 37 Key ESG Indicators

Government Launches Twin Initiatives: DDKY & National Mission on Natural Farming

Indore Municipal Corporation's Green Bond: A Milestone in Urban Sustainability