डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल DNA Model
डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये
असलेल्या केंद्रबिंदूमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल होय.
प्रथम हे आम्ल फक्त केंद्रकात सापडले म्हणून याचे नाव केंद्रकाम्ल (Nuclic
acid) ठेवण्यात आले.
डीएनए मध्ये जीवित प्राण्या बद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते
ही माहिती एका पिढीतून दुसर्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना
कारणीभूत असते.
गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून
येते .
मानवी शरीर रचनेमध्ये मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता,
कौशल्य,
डोळ्याचा
रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व महत्त्वाचे घटक असतात. हे घटक गुणसूत्रे ठरवतात.
गुणसूत्रे मुख्यत: डी.एन.ए.ची बनलेली असतात.
डी.एन.ए. रेणूतील प्रत्येक धागा न्युक्लीओटाइड नावाच्या अनेक लहान
रेणूंचा बनलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनीन, ग्वानीन,
सायटोसीन
व थायमीन अशा चार प्रकारचे असतात.
Comments
Post a Comment