कान Ear


 

कर्ण हे मानवीय जीवनात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावतो. हे श्रवना बरोबरच शरीराला संतुलित ठेवतो 

 

मानवीय कानाचे तीन भाग आहे : बाह्य कर्ण ,मध्य कर्ण ,आंतरिक कर्ण

 

ध्वनीतरंग  कानावर  पडल्याने कानातील  पडदा कंपित होतो व त्या कंपनांचे विद्युत लहरीत रूपांतर  होते. त्या श्रवणविषयक मज्जा तंतूद्वारे मेंदूकडे प्रवास करतात.

 

बाह्यकर्ण (Pinna) ध्वनीतरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्यकर्ण पोकळीत पोहोचवतो. झडपेसारखी रचना असलेल्या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज नरसाळ्यातून बाहेर पडावे तसे मध्यकर्णापर्यंत पोहोचतात.

 

मध्यकर्ण(Middle Ear) : मध्यकर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो. जेव्हा माध्यमातील संपीडन पोहचतो तेव्हा तो पडद्याच्या बाहेरील दाब वाढवतो आणि कानाचा पडदा आत ढकलतो तसेच जेव्हा विरलन पडद्यापाशी पोहोचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब कमी होतो व पडदा बाहेरच्या बाजूला ढकलला जातो. याप्रकारे ध्वनीतरंगामुळे पडद्याचे कंपन होते.

 

आंतरकर्ण(Inner Ear):  ध्वनीविषयक मज्जातंतूचा भाग आंतरकर्णाला मेंदूशी जोडतो आंतरकर्णात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते तिला कर्णावर्त म्हणतात. कर्णावर्ता मध्ये कानाच्या पडद्या पासून आलेली कंपने स्वीकारली जाऊन ती मज्जातंतू द्वारे विद्युत संकेतांच्या स्वरूपात मेंदूकडे पाठवली जातात व नंतर मेंदूत त्या संकेतांचे विश्लेषण होते.


Comments

Popular posts from this blog

स्वधा स्तोत्र (Swadha Stotra)

MSCI 37 Key ESG Indicators

ESG Implementation Timeline