मेंदू Human Brain
मेंदू - हा प्राण्यांच्या शरीरातील एक गुंतागुंतीचा अवयव आहे.
हा अवयव डोक्यामध्ये कवटीच्या आत असतो.
शरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया मेंदूकडून नियंत्रित केल्या
जातात.
मानवी मेंदूची डावी बाजू शरीराची उजवी बाजू नियंत्रित करते.
या व्यतिरिक्त मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण व
तर्कसंगत विचार नियंत्रित करते तर उजवी बाजू आपल्या कलाक्षमता नियंत्रित करते.
प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे 1300 ते 1400
ग्रॅम इतके असून तो सुमारे 100 अब्ज चेतापेशींचा बनलेला असतो.
प्रमस्तिष्क (Cerebrum):हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो
दोन प्रमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो.मेंदूचा एवढा भाग प्रमस्तिष्काने
व्यापलेला असतो म्हणूनच याला मोठा मेंदू असेही संबोधतात. प्रमस्तिष्काचा बाहेरील
पृष्ठभाग हा अनियमित वळ्या व खाचा यांनी बनलेला असतो. त्यांना संवलन असे म्हणतात.
यामुळे प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते व चेतापेशींसाठी भरपूर जागा
मिळते.
अनुमस्तिष्क (Cerebellum): हा मेंदूचा छोटा
भाग असून, कर्परगुहेच्या (कवटीच्या) मागील बाजूस तर प्रमस्तिष्काच्या खालील बाजूस
असतो. याचा पृष्ठभाग वळ्यांऐवजी उंचवटे व खळगे या स्वरूपांत असतो.
मस्तिष्कपुच्छ (Medulla- oblongata):हा मेंदूचा
सर्वात शेवटचा किंवा पुच्छबाजूचा भाग असून याच्या वरील बाजूस दोन त्रिकोणाकृती
उंचवट्यासारख्या संरचना असतात. त्यांना पिरॅमिड म्हणतात. याच्या पश्चभागाचे पुढे
मेरुरज्जूत रूपांतर होते.
Comments
Post a Comment