हृदय Human Heart
हृदय हा अवयव अभिसरण संस्था असलेल्या सर्व प्राण्यामध्ये आढळतो
सामान्यपणे मानवी हृदय दर मिनिटास 72 वेळा आकुंचन
पावते
स्त्रियामध्ये हृद्याचे सरासरी वजन 250-300 ग्रॅम आणि
पुरुषामध्ये 300-350 ग्रॅम असते
उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते.
हृदय हे सतत आकुंचन व प्रसरण पावत असते.
छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असत.
आपल्या हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असते. या हृदयावरणाच्या दोन
थरांमध्ये एक द्रवपदार्थ असतो, त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यांपासून
हृदयाचे संरक्षण होते.
मानवी हृदय हा एक स्नायूमय, मांसल अवयव आहे. हृदय हे हृदयस्नायूंचे
बनलेले असते.
हृदय स्नायू अनैच्छिक असतात. त्यांचे आकुंचन व शिथिलीकरण एका निश्चित
तालात होत असते.यालाच हृदयाचे स्पंदन म्हणतात.
हृदयाचे आतील उभ्या पडद्यामुळे डावे व उजवे असे दोन भाग पडतात. या
भागांचे परत दोन-दोन कप्पे पडतात. अशा प्रकारे हृदयाचे चार कप्पे असतात. वरच्या
कप्प्यांना अलिंद तर खालील कप्प्यांना निलय असे म्हणतात.
हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचविण्याच्या आणि
तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस ‘रक्ताभिसरण’ म्हणतात.
रक्त सतत फिरते राहण्यासाठी हृदयाच्या आकुंचन आणि शिथिलीकरण या
एकांतरीत क्रिया घडत असतात.
हृदयाचे लागोपाठचे एक आकुंचन व एक शिथिलीकरण मिळून हृदयाचा एक ठोका
होतो.
Comments
Post a Comment