श्वसन संस्था Respiratory System
शरीराच्या परिसरातील हवेतून ऑक्सिजन वायूचे ग्रहण करणे आणि हवेत
कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे उत्सर्जन करणे या कार्यासाठी विकसित झालेल्या इंद्रिय
प्रणालीस श्वसन तंत्र असे म्हणतात.
नाक व तोंडापासून सुरू होणारा श्वसनमार्ग, फुप्फुसे,
छातीचा
पिंजरा आणि श्वसनक्रियेवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील केंद्र यांचा समावेश श्वसन
तंत्रात होतो.
मानवी शरीरात श्वसन संस्थेच्या साहाय्याने ऑक्सिजनच्या सन्निघ्यात
श्वसन प्रक्रिया पूर्ण होते. मानवी श्वसनसंस्था खालील अवयवांची बनलेली असते.
नाक (Nose): श्वसनक्रियेची व श्वसनसंस्थेची सुरुवात
नाकापासून होते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या साहाय्याने हवा गाळून आत
घेतली जाते.
घसा (Pharynx) : घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू
होतात. श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण
असते. अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते. त्यामुळे
श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. इतर वेळी श्वासनलिका उघडी असते. यामुळे
हवा घशातून श्वासनलिकेत जाते.
श्वासनलिका (Trachea) : श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग
स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला दोन फाटे फुटतात. एक फाटा
उजव्या फुफ्फुसाकडे व दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे जातो.
फुप्फुसे (Lungs) : छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व
उजव्या बाजूस एकेक फुफ्फुस असते. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी आवरण असते. त्यास
फुप्फुसावरण (Pleura) म्हणतात. फुप्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात. फुप्फुसे लहान
लहान कप्प्यांनी बनलेली असतात. त्यांना वायुकोश म्हणतात.
Comments
Post a Comment